Donald Trump यांनी मतदानाचे नियम बदलले ; मतदार नोंदणीसाठी आता ‘हा’ पुरावा द्यावा लागणार

Donald Trump यांनी मतदानाचे नियम बदलले ; मतदार नोंदणीसाठी आता 'हा' पुरावा द्यावा लागणार

100
Donald Trump यांनी मतदानाचे नियम बदलले ; मतदार नोंदणीसाठी आता 'हा' पुरावा द्यावा लागणार
Donald Trump यांनी मतदानाचे नियम बदलले ; मतदार नोंदणीसाठी आता 'हा' पुरावा द्यावा लागणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणूक प्रक्रियेत बदल करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत, अमेरिकन नागरिकांना मतदार नोंदणीसाठी नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे. निवडणुकीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी ट्रम्प (Donald Trump) यांनी हा आदेश दिला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मते, मतदार यादीत बेकायदेशीरपणे समाविष्ट असलेल्या स्थलांतरितांवर कारवाई करणे हा उद्देश आहे. (Donald Trump)

हेही वाचा- अवैध हुक्का पार्लरचा परवाना रद्द करणार ; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

२०२० च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या पराभवासाठी बनावट मतदानाला जबाबदार धरले होते. तथापि, राज्यांनी ट्रम्पच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शविली आहे. आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, ” ‘निवडणूक घोटाळा’. तुम्ही हा शब्द ऐकला असेलच. मी ते उध्वस्त करणार आहे. कार्यकारी आदेशात असे म्हटले आहे की, अमेरिका आवश्यक निवडणूक सुरक्षा लागू करण्यात अयशस्वी ठरली आहे. यामध्ये राज्यांना व्हाईट हाऊसला सहकार्य करण्यास सांगितले आहे. जर कोणत्याही राज्याने यामध्ये मदत केली नाही, तर त्यांना मिळणारा निधी थांबवला जाऊ शकतो.” (Donald Trump)

मतदानासाठी नियम काय ?
अमेरिकेत मतदानाबाबत एकसारखे नियम नाहीत. प्रत्येक राज्याचे स्वतःचे कायदे असतात. टेक्सास, जॉर्जिया आणि इंडियाना सारख्या राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत कडक आहेत. येथे मतदान करण्यासाठी, फोटो असलेले ओळखपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) दाखवणे आवश्यक आहे. त्याच वेळी, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि इलिनॉय सारखी राज्ये मतदानाबाबत तितकी कठोर नाहीत. या राज्यांमध्ये, नाव आणि पत्ता देऊन किंवा वीज बिल सारखे कोणतेही कागदपत्र दाखवून मतदान करता येते. याशिवाय, मिशिगनसारख्या राज्यात मतदान करताना फोटो ओळखपत्र मागितले जाते. जर एखाद्याकडे हे नसेल तर तो प्रतिज्ञापत्रावर सही करून मतदान करू शकतो. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.