अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाकडून शनिवारी रात्री एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कातून स्मार्टफोन, संगणक आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या वस्तूंवर अमेरिकेकडून आयात शुल्क आकारले जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या कचाट्यातून या वस्तूंना मुक्ती मिळाली आहे. (Donald Trump)
हेही वाचा-१३ एप्रिल १९१९ या दिवशी British सरकारने केला होता रक्तपात; नेमके काय घडलेले?
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन बाजारपेठेत येणाऱ्या जगातील अन्य देशांच्या उत्पादनांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामध्ये भारतावर 26 टक्के कर लादण्यात आला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचे अमेरिकेत विपरीत पडसाद उमटले होते. आयात शुल्क लादल्याने अमेरिकन बाजारपेठेत बाहेरुन येणाऱ्या वस्तुंची किंमत वाढली होती. याचा अमेरिकन नागरिकांना फटका बसला होता. (Donald Trump)
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकन नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागू नयेत म्हणून काही गोष्टी टॅरिफच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला. ॲपल, सॅमसंग यांच्यासारख्या बड्या कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे ॲपल, सॅमसंग या कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची अमेरिकन बाजारपेठेतील किंमत कैकपटीने वाढली असती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची चीनबाबतची कठोर भूमिका कायम आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community