डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशीपासून ट्रम्प अॅक्शमोडवर आले आहेत. पहिल्यांदा त्यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर निर्वासितांवर कारवाई केली. आतापर्यंत ५७८ लोकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आता भारता शेजारील असलेला देश बांगलादेशावर (Bangladesh) मोठी कारवाई केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे तीन महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे आता बांगलादेशच्या (Bangladesh) अडचणी वाढल्या आहेत.
(हेही वाचा Republic Day : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात निवृत्त कर्नल विजय भावे यांच्या हस्ते ध्वजवंदन)
डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID/बांगलादेश करार, कार्य आदेश, अनुदान, सहकारी करार किंवा इतर सहाय्य किंवा संपादन साधनांतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवण्याचे किंवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी अनेक देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर ९० दिवसांसाठी बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी युक्रेनला देण्यात येणारी मदत थांबवली होती. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात बायडेन प्रशासनाने युक्रेनला बरीच मदत करणे सुरू ठेवले, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच ती मदत थांबवली आहे. ट्रम्प यांनी बांगलादेशला (Bangladesh) दिला झटकाबांगलादेशचे मोहम्मद युनूस हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे जवळचे मानले जातात. ट्रम्प प्रशासनाने पुढील महिन्यात होणाऱ्या नॅशनल ब्रेकफास्ट प्रेयर्स बीएनपी नेत्यांनाही आमंत्रित केले आहे. या बैठकीनंतर, अमेरिका बांगलादेशात लवकरच निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकू शकतो असं मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community