Donald Trump यांच्या अडचणी वाढल्या! ३४ प्रकरणात दोषी, तरीही निवडणूक लढवणार ?

154
Donald Trump यांच्या अडचणी वाढल्या! ३४ प्रकरणात दोषी, तरीही निवडणूक लढवणार ?
Donald Trump यांच्या अडचणी वाढल्या! ३४ प्रकरणात दोषी, तरीही निवडणूक लढवणार ?

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प यांना 34 प्रकरणात दोषी ठरवले आहे. यामध्ये निवडणुकीतील निकालात हे फेरफार करण्याचा कट रचल्याचा आरोप, लैंगिक शोषण आणि लाचखोरी सारख्या प्रकरणांचा समावेश आहे. न्यायालयात खटला दाखल झाल्यापासून ट्रम्प यांनी स्वतःला निर्दोष म्हणून जाहीर केले होते. आता त्यांना दोषी ठरवल्यानंतर हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Donald Trump)

येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणुकीचे पडघम आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. ट्रम्प यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. न्यायालयाने त्यांना अजून शिक्षा सुनावलेली नाही. हनी-मनीप्रकरणात अडकलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहे. जर ट्रम्प यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली तर त्यांना निवडणूक लढवता येईल का? त्यांच्या प्रचारावर काय परिणाम होईल, यावर जगभर चर्चा होत आहे. (Donald Trump)

शिक्षा केव्हा ?

ट्रम्प (Donald Trump) यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पण अजून शिक्षा सुनावलेली नाही. याप्रकरणात 11 जुलै रोजी सुनावणी होईल. त्यादिवशी शिक्षा ठोठाविण्यात येईल. अमेरिकन कायद्यानुसार, त्यांना 4 वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनापूर्वीच शिक्षेचा निकाल येणार आहे. 15 जुलै रोजी पक्षाचे अधिवेशन होत आहे. त्याच्या चार दिवसाआधी त्यांना काय शिक्षा ठोठविण्यात येते, हे स्पष्ट होईल. या अधिवेशनात ट्रम्प यांच्या उमेदवारीची पक्ष अधिकृत घोषणा करणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक होत आहे. त्यावर या शिक्षेचा थेट परिणाम दिसून येईल. (Donald Trump)

ट्रम्प निवडणूक लढवू शकतील ?

अमेरिकेतील कायद्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवल्यानंतर पण ते निवडणुकीच्या शर्यतीत भाग घेऊ शकतील. शिक्षेच्या त्यांच्या उमेदवारीवर कोणताही परिणाम होणार नाही. हा निकाल समोर येताच ट्रम्प यांच्या निवडणूक टीमने निधी जमविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचे नाव ‘मी राजकीय कैदी आहे’ असे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रम्प (Donald Trump) पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. अमेरिकन घटनेनुसार, ट्रम्प राष्ट्रपती निवडणूक लढवू शकतील. संविधानात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी वयाची 35 वर्षे पूर्ण आणि मुळ अमेरिकन नागरिक असण्याची अट आहे. त्यामुळे ट्रम्प हे तुरुंगातून सुद्धा निवडणूक लढवू शकतील. (Donald Trump)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.