-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी सोमवारी अमेरिकेत आयात होणाऱ्या ॲल्युमिनिअम आणि पोलादावर सरसकट २५ टक्के आयात शुल्क (Tariff) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबरोबरच आधी मेक्सिको, ब्राझील आणि कॅनडा या देशांतून येणाऱ्या धातूंना मिळणारी विशेष सवलत आता रद्द होणार आहे. हे शुल्क १० टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांवर गेलं आहे. २०१८ च्या निवडणुकीनंतर काही वस्तूंवर आयात शुल्क माफ करण्याचा करार अमेरिकेनं काही देशांबरोबर केला होता. त्यानुसार, ॲल्युमिनिअम आणि पोलाद आयातीसाठी काही देशांना कोटाही ठरवून देण्यात आला होता. पण, हा कोटा आणि इतर सर्व सवलती आता रद्द होतील.
याशिवाय अमेरिकेत आयात होणारं पोलाद आणि ॲल्युमिनिअम कसं असावं यासाठीचे निकषही आता बदलण्यात आले आहेत. पोलाद हे ‘वितळलेलं आणि पुळीदार’ हवं तर ॲल्युमिनिअम हे थेट खाणीतून आलेलं तसंच साचेबद्ध पाहिजे अशा अटी आता घालण्यात आल्या आहेत. चीनमधून कमीत कमी प्रक्रिया केलेलं पोलाद अमेरिकेत येतं, त्यावर यामुळे आळा बसणार आहे.
(हेही वाचा – दिल्लीला पुन्हा एकदा महिला Chief Minister मिळण्याची शक्यता)
‘अमेरिकेत तयार होणारं पोलाद आणि ॲल्युमिनिअम यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही आयात शुल्क (Tariff) वाढ आवश्यक होती. त्यातून अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकन अर्थव्यवस्था स्थिर होणार आहे,’ असं व्हाईटहाऊसचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नव्होरो (Peter Navarro) यांनी बोलून दाखवलं आहे.
मेक्सिको आणि कॅनडा या देशांना या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. सध्या धातूंवर आयात शुल्क (Tariff) वाढवण्यात आलं असलं तरी येणाऱ्या दिवसांमध्ये वाहन उद्योग, फार्मा आणि संगणकातील चिप यांच्यावरही शुल्क (Tariff) वाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या शुल्कवाढीतून ऑस्ट्रेलिया या एकमेव देशाला सूट मिळू शकते. कारण, ऑस्ट्रेलियाकडून अमेरिकन माल मोठ्या प्रमाणावर आयात होतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community