‘सौदीने तेलाची किंमत कमी करावी, अमेरिकन गुंतवणूक वाढवावी’ ; Donald Trump दावोसमध्ये म्हणाले…

38
'सौदीने तेलाची किंमत कमी करावी, अमेरिकन गुंतवणूक वाढवावी' ; Donald Trump दावोसमध्ये म्हणाले...
'सौदीने तेलाची किंमत कमी करावी, अमेरिकन गुंतवणूक वाढवावी' ; Donald Trump दावोसमध्ये म्हणाले...

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 23 जानेवारी 2025 रोजी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ला संबोधित केले. व्हाईट हाऊसमधून बोलताना ट्रम्प यांनी आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. अमेरिकेत उत्पादन आणण्यासाठी त्यांनी कंपन्यांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, त्यांनी अटी मान्य न केल्यास शुल्क लागू करण्याबाबत भाष्य केले. रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) संपवण्याच्या वचनबद्धतेचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. (Donald Trump)

तेलाची किंमत कमी करावी
यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी ग्रीन न्यू डील संपुष्टात आणली आहे. याला मी ग्रीन न्यू स्कॅम म्हणेन. मी एकतर्फी पॅरिस जलवायु समझोत्यातून माघार घेतली आहे. महागड्या इलेक्ट्रीक गाड्यांच्या सक्तीला संपविले आहे. अमेरिकेकडे पृथ्वीवरील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कच्चे तेल आहे. मी त्याचा वापर करणार आहे. मी सौदीला आणि ओपेक देशांना कच्च्या तेलाचे दर कमी करावेत असे सांगत आहे. तुम्हाला ते कमी करावे लागतील.” (Donald Trump)

सौदीमध्ये $1 ट्रिलियन गुंतवणुकीचे लक्ष्य
सौदीने कच्च्या तेलाचे दर कमी केले तर रशिया आणि युक्रेन युद्धही संपेल, असेही ट्रम्प म्हणाले. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला. सौदी अरेबिया अमेरिकेत 600 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी उघड केले. ही गुंतवणूक $1 ट्रिलियनपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. (Donald Trump)

अमेरिकेतील उत्पादन बंद केल्यास …
याचबरोबर ट्रम्प यांनी उद्योजकांना इशारा दिला आहे. अमेरिकेत उत्पादने विकायची असतील तर ती अमेरिकेतच निर्माण करा, नाहीतर टेरिफला तयार रहा असे ट्रम्प म्हणाले. आम्ही तुम्हाला जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात कमी कर देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. कंपन्यांना त्यांची उत्पादने कुठे बनवायची हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी, अमेरिकेतील उत्पादन बंद केल्याने आर्थिक परिणाम होतील, जादाचा कर द्यावा लागेल, असे ट्रम्प म्हणाले. (Donald Trump)

लवकरच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटणार
ट्रम्प यांच्या 2025 च्या भाषणाचा एक महत्त्वाचा भाग रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यावर भर होता, ज्याला त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रमुख प्राधान्य म्हणून सांगितले होते. आपण या समस्येचे निराकरण कसे करणार याबद्दल त्यांनी जास्त माहिती दिली नसली तरी, त्यांनी पुनरुच्चार केला की हे त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांनी WEF मध्ये सांगितले की, मला लवकरच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटून हे युद्ध संपवायचे आहे. हे भयंकर युद्ध आपल्याला थांबवायचे आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.