Donald Trump यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला दिला इशारा; म्हणाले…

36
Donald Trump यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला दिला इशारा; म्हणाले...
Donald Trump यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला दिला इशारा; म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी (Palestinian terrorists) गट हमासला धमकी दिली आहे.ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा अन्यथा गाझात विध्वंस होईल, सर्वकाही उद्ध्वस्त करून टाकू, अशी धमकी ट्रम्प यांनी हमासला दिली आहे. ट्रम्प यांनी इस्रायली ओलिसांना सोडण्यासाठी हमासला (Hamas) शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ओलिसांना सोडले नाही तर युद्धविराम करार रद्द करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

( हेही वाचा : स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय न होता विकास करणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही)

ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. युद्धबंदी सुरू ठेवायची की संपवायची याचा निर्णय सर्वस्वी इस्रायलचा असेल, परंतु उर्वरित सर्व ओलिसांना तीन किंवा चारच्या गटात सोडू नये तर एकत्रच सोडले पाहिजे. आम्हाला सर्व ओलिसांची एकाचवेळी सुटका हवी आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हमास युद्धविराम कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत इस्रायलने यापूर्वी युद्धविराम रद्द करण्याची धमकी दिली होती. ट्रम्प म्हणाले की ते शनिवारच्या अंतिम मुदतीबद्दल इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशीही बोलतील. तथापि, याबद्दल फारशी माहिती देण्यात आली नाही. ट्रम्प म्हणाले की, मी काय म्हणायचे आहे ते हमास स्वतःच समजेल.

ट्रम्प यांनी हमास आणि इस्रायल या दोन्ही गटाला सहकार्य करावे. दोघांची बाजू समजून घ्यावी. जर त्यांनी अशा प्रकारे विध्वंस करण्याची धमकी दिली तर मुद्दा आणखी चिघळेल, असे हमासचे प्रवक्ते सामी अबु झुरी यांनी म्हटले आहे. युद्धविराम करारात दोन्ही गटाचा सन्मान करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे ट्रम्प यांनी विसरू नये. हमासच्या धमकीनंतर इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी गाझापट्टीभोवती सैन्य तैनात केले आहे. प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार राहा असे आदेश नेतन्याहू यांनी सैन्याला दिले आहेत. दरम्यान, युद्धविराम करारानुसार 19 जानेवारीपासून हमासने 21 ओलिसांना सोडले आहे, तर इस्रायलने 730 पॅलेस्टिनी पैद्यांना सोडले आहे.

यापूर्वी, ट्रम्प यांनी गाझा ताब्यात घेण्याबद्दल आणि तेथे एक सिटी रिसॉर्ट बांधण्याबद्दल बोलले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की पॅलेस्टिनी लोकांना गाझामधून विस्थापित करून जॉर्डन आणि इजिप्तमध्ये (Egypt) स्थायिक करावे. तथापि, जॉर्डन आणि इजिप्त दोघांनीही या योजनेला विरोध केला आहे. यावर आता जर इजिप्त आणि जॉर्डन यांनी पॅलेस्टिनींना आश्रय दिला नाही तर अमेरिका त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवेल अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.