“मी पुन्हा सत्तेत आलो तर भारतावर…”, Donald Trump यांनी काय दिला इशारा?

145
"मी पुन्हा सत्तेत आलो तर भारतावर...", Donald Trump यांनी काय दिला इशारा?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की जर ते सत्तेवर निवडून आले तर त्यांचे प्रशासन परस्पर कर लागू करेल आणि परदेशी उत्पादनांवर उच्च शुल्क आकारणाऱ्या भारतासारख्या देशांवर उच्च शुल्क लागू करेल. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही नक्कल केली. पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर दुप्पट कर आकारण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिला.

‘भारतावर काउंटर टॅक्स लावणे गरजेचे’

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प (Donald Trump) म्हणाले, चीन २००% कर वसूल करतो, ब्राझीलही भरपूर कर आकारतो. मात्र, प्रमुख देशांत भारत सर्वाधिक कर वसूल करतो. आर्थिक धोरणावर ट्रम्प म्हणाले, अमेरिकन लोकांना पुन्हा समृद्ध बनवण्यासाठी भारतावर काउंटर टॅक्स लावणे गरजेचे आहे. ट्रम्प यांनी डेट्राॅइट येथील भाषणात राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एका वर्षात वीजदर अर्धे करण्याचे आश्वासन दिले.

‘मोदी करामध्ये कपात करत नाहीत’

डेट्राॅइटमधील सभेत ट्रम्प (Donald Trump) म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मोठे नेते आहेत. एक नेता म्हणून ते चांगले काम करत आहेत. मोदींच्या प्रयत्नांमु‌ळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बळकट झाले आहेत. मोदींची नक्कल करत ट्रम्प पुढे म्हणाले, असे असतानाही मोदी करामध्ये कपात करत नाहीत. मोदींच्या २०१९ च्या ह्यूस्टन दौऱ्याचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हाउडी माेदी कार्यक्रमादरम्यान त्यांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला होता. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.