अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु झालेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भारत आणि अमेरिकेतील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा विश्वास दिला आहे. तसेच आम्ही हिंदूंचे संरक्षण करू, अशी घोषणा ही त्यांनी केली आहे. (Donald Trump)
( हेही वाचा : Gautam Adani Net Worth : गौतम अदानींची एकूण मालमत्ता गेल्या ५ वर्षांत १० लाख कोटींनी वाढली)
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, मुस्लिमबहुल बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूवर आणि इतरत्र अल्पसंख्याकांवर झालेल्या रानटी हिंसाचाराचे मी तीव्र निषेध करतो. हिंदूवर जमावाकडून हल्ले होत असून बांगलादेशमध्ये लूट केली जात असल्याने अराजकता माजली आहे. माझ्या काळात असे कधीच घडले नव्हते. कमला हॅरिस (Kamala Harris) आणि जो बायडेन यांनी अमेरिकेसह संपूर्ण जगातील हिंदूकडे दुर्लेक्ष केले. मात्र या निवडणुकीत मी सत्तेवर आल्यास कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्याला दूर सारून हिंदूंचे रक्षण करणार आहे, असे ही ट्रम्प (Donald Trump) म्हणाले. तसेच आम्ही अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. (Donald Trump)
हेही पाहा :