सीरियातील (Syria) परिस्थिती स्फोटक बनली आहे. सीरियाचे सैन्य कमकुवत होत असून लढवय्ये एकामागून एक शहरे काबीज करत आहेत. बंडखोर गटाचे सैनिक सीरिया सरकारच्या विरोधात बंड पुकारलेला गट हयात तहरीर अल-शाम (HTAS) ने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी, ‘सीरियातील परिस्थितीमध्ये अमेरिकेने सीरियापासून दूर राहावे.’ असे म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ट्रम्प यांनी म्हटल आहे कि, “एका अभूतपूर्व हालचालीत, सीरियातील विरोधी सैनिकांनी अत्यंत समन्वित हल्ल्यात अनेक शहरे पूर्णपणे काबीज केली आहेत आणि ते आता दमास्कसच्या सीमेवर आहेत, असदला पराभूत करत आहेत,”असे त्यांनी म्हटले.त्यासोबतच “आम्ही एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहोत.” असेही म्हटले आहे. “रशिया (Russia) जो युक्रेनमध्ये (Ukraine) वाईटरित्या अडकला असून त्यांनी ६ लाखांहून अधिक सैनिकांना गमावलं आहे. ते आता सीरियातील वाढता तणाव आणि हल्ले रोखण्यास असमर्थ असल्याचं दिसतंय. सीरिया अनेक वर्षांपासून रशियाला आपला पाठिंबा दर्शवत आलाय.” (Donald Trump)
हेही वाचा-Syria पुन्हा पेटले; राष्ट्रप्रमुख बशर अल असद यांचे विमान पाडले?
पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, येथेच माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी वाळूतील लाल रेषेचे रक्षण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करण्यास नकार दिला आणि रशियाच्या हस्तक्षेपाने सर्वकाही चुकीचे झाले. “परंतु आता त्याला शक्यतो असदप्रमाणे बाहेर काढले जात आहे आणि हीच त्याच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट असू शकते.”तसेच “सिरियामध्ये रशियासाठी कधीही मोठा फायदा झाला नाही, ओबामाला खरोखर मूर्ख बनवण्याव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत, सीरिया हा गोंधळ आहे, परंतु तो आपला मित्र नाही आणि अमेरिकेचा त्याच्याशी काहीही संबंध नसावा. हा आमचा लढा नाही. तुम्ही तुमचं चालु द्या. पण अमेरिकेने यात गुंतू नये!” असं ते म्हणाले आहेत. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community