-
ऋजुता लुकतुके
‘नरेंद्र मोदी (Narendra Modi) माझे चांगले मित्र आहेत. पण, त्यांनीही अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही,’ असं म्हणत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी भारतावरही २६ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. २ एप्रिल रोजी ट्रंप यांनी अमेरिकेचा ‘मुक्ती दिन’ जाहीर केला होता. आणि ‘अमेरिकेला पुन्हा शक्तिशाली बनवणार’ या आपल्या मोहिमेअंतर्गत बाहेरून आयात होणाऱ्या मालावर त्यांनी आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ट्रंप प्रशासन नेमका काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानुसार, ट्रंप आपल्याबरोबर एक डिजिटल बोर्डच (Digital board) घेऊन आले. आणि त्यांनी चीन, भारत, मलेशिया यांच्यासह अनेक देशांतून आयात होणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली. जे देश अमेरिकन मालावर जास्त शुल्क लावतात, त्या देशांवर त्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याचं ट्रंप यांचं धोरण आहेय. (Donald Trump Tariff War)
अमेरिकेचा प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर ३४ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना बसू शकतो.
(हेही वाचा – Mhada च्या वसाहतीतही ‘आपला दवाखाना’; वैद्यकीय सुविधेसाठी प्राधिकरणाचा पुढाकार)
दरम्यान, अमेरिकेच्या या धाडसी निर्णयाचा परिणाम प्रामुख्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायने, औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांवर होणार आहे. या उद्योगांवर ट्रंप प्रशासनाकडून अतिरिक्त आयात शुल्क आकारले जाऊ शकते. अमेरिकी सरकारने आयात शुल्कातील या बदलाच्या अनुषंगाने २ एप्रिलची मुदत निश्चित केली होती. त्यासाठीचा दिवस हा अर्थकारणामध्ये ‘लिबरेशन डे’ म्हणून साजरा करण्यात येईल, असेही अमेरिकी प्रशासनाने सांगितले होते.
“…You are not treating us right”: Trump announces 26% tariffs on India
Read @ANI | Story https://t.co/cLGLF9CFbn#US #India #tariff #DonaldTrump pic.twitter.com/hVy0DMEISd
— ANI Digital (@ani_digital) April 2, 2025
डोनाल्ड ट्रंप म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे माझे सर्वांत चांगले मित्र असूनही भारत अमेरिकेशी योग्य वागत नाही. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन उत्पादनांवर ५२ टक्के कर लादत असल्याने अमेरिकाही त्या बदल्यात २६ टक्के कर लादेल.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांचा शिवसेना उबाठाला टोला; बाळासाहेबांचा अंश बाकी असेल तर…)
भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादल्याने अमेरिकन ग्राहकांनाही महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात. दरम्यान, भारत आणि इतर प्रभावित देश प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करू शकतात आणि अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवू शकतात. यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकते. पण, सध्या ट्रंप यांचा दावा आहे की या आयात शुल्कावाढीमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होईल. (Donald Trump Tariff War)
डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिका चीनकडून ३४ टक्के, युरोपियन युनियनकडून २० टक्के, जपानकडून २४ टक्के, दक्षिण कोरियाकडून २५ टक्के, स्वित्झर्लंडकडून ३१ टक्के, युनायटेड किंग्डमकडून १० टक्के, तैवानकडून ३२ टक्के, मलेशियाकडून २४ टक्के आणि भारताकडून २६ टक्के आयात शु्ल्क वसूल करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community