Donald Trump यांचा बांगलादेशला मोठा झटका ; सबसिडी आणि करार तात्काळ बंद

78
Donald Trump यांचा बांगलादेशला मोठा झटका ; सबसिडी आणि करार तात्काळ बंद
Donald Trump यांचा बांगलादेशला मोठा झटका ; सबसिडी आणि करार तात्काळ बंद

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने बांगलादेशातील सर्व मदत आणि प्रकल्प थांबवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशच्या युनूस सरकारसाठी (Yunus Sarkar) हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. ट्रम्प (Donald Trump) सत्तेत आल्यानंतर हे पहिले मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे बांगलादेशला (Bangladesh) विकास कामांसाठी मिळणारी मदत थांबणार आहे.

Donald Trump यांचा बांगलादेशला मोठा झटका ; सबसिडी आणि करार तात्काळ बंद
Donald Trump यांचा बांगलादेशला मोठा झटका ; सबसिडी आणि करार तात्काळ बंद

यूएसएआयडीने (USAID) आपल्या निर्णयात सर्व प्रकारच्या कामाच्या ऑर्डर, करार आणि खरेदी प्रक्रिया थांबवल्या आहेत. यूएसएआयडी बांगलादेशला आरोग्य, शिक्षण, शेती आणि आर्थिक सुधारणा यासारख्या क्षेत्रात व्यापक मदत करत होती. या निर्णयामुळे तिथे सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. (Donald Trump)

गरीब देशांना आरोग्य मदत देण्यावरही बंदी
याबाबत USAID कडून पत्रही जारी करण्यात आले आहे. या पत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील कार्यकारी आदेशाचा हवाला देत असे म्हटले की, “सर्व USAID भागीदारांना USAID आणि बांग्लादेश करारांतर्गत दिलेली कोणतीही सबसिडी, सहकारी करार किंवा इतर सहाय्य तात्काळ थांबवण्याचे किंवा बंद करण्याचे आदेश दिले जात आहेत.” तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारपासून इस्रायल, इजिप्त आणि फूड प्रोग्राम वगळता परदेशातील सर्व मदतीवर बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकेच्या राज्य मंत्रालयाच्या या आदेशात गरीब देशांना आरोग्य मदत देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. (Donald Trump)

बांगलादेशची अर्थव्यवस्था झपाट्याने घसरतेय
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशचे आर्थिक मॉडेल सपशेल अपयशी ठरल्याची भीती तज्ज्ञांना आहे. जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बांगलादेशचा GDP वाढीचा अंदाज 0.1% ने कमी करून 5.7% केला आहे. महागाईचा दर 10 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. अमेरिकेची मदत बंद झाल्याने बांगलादेशच्या अडचणी आणखी वाढू शकतात. सतत वाढत जाणारी अर्थसंकल्पीय तूट, घसरणारा परकीय चलन साठा, घसरणारे चलन मूल्य आणि वाढती उत्पन्न असमानता यासारख्या संकटांनी बांगलादेशसाठी आधीच अडचणी निर्माण केल्या आहेत. बांगलादेशची अर्थव्यवस्था झपाट्याने घसरत आहे. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.