डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सत्तेवर येताच अमेरिकेने कोरोना महामारीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने (CIA) म्हटले आहे की, कोविड-१९ नैसर्गिक नव्हता तर याची उत्पत्ती प्रयोगशाळेतून झाली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही कोरोना व्हायरसला (Corona Virus) ट्रम्प यांनी ‘चिनी विषाणू’ असे संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते. (Donald Trump)
सीआयएने काय म्हटले ?
लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि लाखो मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर एक मोठा प्रश्न आहे. चीनने (China ) अमेरिकेच्या अहवालाचे वर्णन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. सीआयएने दाव्यात म्हटले आहे की, कोविड विषाणू निसर्गातून नव्हे तर प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे. एजन्सीने या दाव्यांवर कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. बायडेन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आला होता. (Donald Trump)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या विनंतीवरून शनिवारी ते सार्वजनिक करण्यात आले. कोरोना विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला याबाबत चिनी अधिकाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव असल्याने या प्रश्नांची उत्तरे कधीच पूर्णपणे मिळणार नाहीत, असा दावाही गुप्तचर विभागाने केला आहे. (Donald Trump)
कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चिनी विषाणू’
कोरोना विषाणूचा प्रसार अमेरिकेत सर्वाधिक झाला. अमेरिकेत लाखो लोकांनी प्राण गमावले. ट्रम्प यांनी त्यांच्या गेल्या कार्यकाळात कोरोना विषाणूबाबत चीनवर जोरदार निशाणा साधला होता. सार्वजनिकरित्या, त्यांनी अनेक वेळा कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चिनी विषाणू’ असा केला आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community