पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या अमेरिका (America) दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी नियोजित कार्यक्रमानुसार संयुक्त पत्रकार परिषददेखील घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये (White House) भेट घेतल्यानंतर त्यांच्या अनौपचारिक गप्पा रंगल्या. मोदींनी ट्रम्प यांची गळाभेट घेतली. (Donald Trump)
‘हाऊडी मोदी’
यानंतर ट्रम्प यांनी स्वत:चं फोटोबुक ‘अवर जर्नी टुगेदर’ (Our Journey Together) पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं. या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ, त्यातील महत्त्वाच्या घटना यांचा समावेश करण्यात आला आहे. या फोटोबुकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना ‘हाऊडी मोदी’ (Howdy Modi) या कार्यक्रमातील फोटोंचाही समावेश करण्यात आला आहे. (Donald Trump)
काय आहे पुस्तकात ?
या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वहस्ताने मोदींसाठी संदेशदेखील लिहिला. यात “मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट” असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुस्तकाची काही पानं उलगडून त्या दोघांचे फोटोही दाखवले. त्यात ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातल्या त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ‘नमस्ते ट्रम्प’ रॅलीतील फोटोदेखील समाविष्ट करण्यात आले होते. ‘ताज महल’जवळ ट्रम्प यांनी लेडी मिलेनिया ट्रम्प यांच्यासोबत काढलेल्या फोटोचाही यात समावेश आहे. (Donald Trump)
ट्रम्प काय म्हणाले ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुस्तकातल्या एका फोटोवर मोदींचं कौतुक करणारी कॅप्शन लिहिली आहे. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आले ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. ते बऱ्याच काळापासून माझे खूप चांगले मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध असून गेल्या चार वर्षांत आम्ही ते कायम राखले आहेत”, असं ट्रम्प यांनी या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community