लोकसभा निवडूक काही दिवसांतच जाहीर होणार आहे. तरीही राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. वंचित बहुजन आघाडीला किती जागा सोडायच्या यावर अजून निर्णय होत नाही. त्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले.
वंचितचा 27 जागांवर दावा
वंचित बहुजन आघाडीने 27 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे पत्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिले होते. मात्र वंचितची जागांची मागणी पाहता तिन्ही पक्षांचे गणित बिघडू शकते. त्यामुळे मविआच्या नेत्यांकडून अद्यापही कोणती घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही व्हिडीओद्वारे वंचित बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
कार्यकर्त्यांना काय केले आवाहन?
महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका अशा सूचना वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठका, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community