धर्मगुरू रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाने अहमदनगरमध्ये आंदोलन केले. त्यावेळी भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महंत रामगिरी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद बोलणाऱ्या मुसलमानांना दम दिला. महाराजांना काही बोलाल तर थेट मशिदीत घुसून ‘चुन चुन के’ मारीन, असा दम दिला.
नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या या भाषणाचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियात व्हायरल झाला. आमच्या रामगिरी महाराजांविषयी…(अपशब्द वापरत). मी तुम्हाला समजेल त्याच भाषेत धमकी देत आहे. तुम्ही आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात काहीही केले तर तुमच्या मशिदीत शिरून तुम्हाला मारले जाईल. एवढे याद राखा, असे नितेश राणे म्हणाले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Join Our WhatsApp Community