माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देऊ नका; Sada Sarvankar यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन घातली भावनिक साद

मी ४० वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो. बाळासाहेब असते, तर त्यांनी मला त्यांच्या नातेवाईकांसाठी जागा सोडायला सांगितली नसती, असे सदा सरवणकर म्हणाले.

208
माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याविषयी सध्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर दबाव आणला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सरवणकर यांच्यावर दबाव येत आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ट्विट करत थेट राज ठाकरे यांनाच भावनिक साद घातली आहे.

काय म्हणाले सरवणकर? 

मी ४० वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो. बाळासाहेब असते, तर त्यांनी मला त्यांच्या नातेवाईकांसाठी जागा सोडायला सांगितली नसती. त्यांचे ५० नातेवाईक दादर-माहिममध्ये राहतात, पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्यकार्यकर्त्याला दिली, ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते. एकनाथ शिंदेंकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला संधी दिली. मी राज ठाकरेंना विनंती करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका, मला आपले समर्थन द्या, असे सदा सरवणकर (Sada Sarvankar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.