PM Narendra Modi : विरोधकांपासून सावध रहा; गरिबांची कामे करा, पंतप्रधानांचा मित्र पक्षांना सल्ला

रालोआला बहुमत मिळवून देण्यासाठी व्यूहरचना आखायला सुरवात

164
PM Narendra Modi : विरोधकांपासून सावध रहा; गरिबांची कामे करा, पंतप्रधानांचा मित्र पक्षांना सल्ला
PM Narendra Modi : विरोधकांपासून सावध रहा; गरिबांची कामे करा, पंतप्रधानांचा मित्र पक्षांना सल्ला

वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याचा विडा उचलला आहे. ही भीष्मप्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्यासाठी छातीला माती लावून मैदानात उतरले आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी रालोआतील घटक पक्षांसोबत मंत्रणा करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीत रालोआला बहुमत मिळवून देण्यासाठी व्यूहरचना आखायला सुरवात केली आहे.

याच श्रृंखलेत मोदी यांनी काल बुधवारी संसदेच्या अनेक्सीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील दक्षिणेतील पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. यात तब्बल ४८ खासदारांनी भाग घेतला होता. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेतील सत्तापक्ष नेते पियुष गोयल, नभोवानी मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आणि अर्जुन राम मेघवाल आदी मंत्री उपस्थित होते.

(हेही वाचा – Nitin Desai : एन.डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घेण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासणार – देवेंद्र फडणवीस)

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये भाजप आणि रालोआच्या घटक पक्षांचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून आणता येईल यावर पंतप्रधानांचा भर आहे. दक्षिणेतील एकाही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही. कर्नाटकमधील भाजपची सत्ता सुध्दा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली आहे. आंध्रप्रदेश (२५), तेलंगना (१७), तामिळनाडू (३९), केरळ (२०) आणि कर्नाटक (२८) या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या १२९ जागा आहेत.

आगामी निवडणुकीत यातील किमान ६० जागांवर भाजप आणि रालोआचे खासदार निवडून यायला पाहिजे, अशी रणनिती भाजपने आखाली आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दक्षिणेतील ४८ खासदारांसोबत निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा केली. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासोबतच योजनांचा लाभ त्यांना कसा मिळेल याकडे लक्ष देण्यात गरज असल्याचा सल्ला मोदी यांनी या बैठकीत दिला. शिवाय, विरोधी पक्षांचे नेते आपल्याला भडकविण्याचा प्रयत्न करतील. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करा आणि गरिबांची सेवा करण्याचे काम सुरू ठेवा, असा सल्ला सुध्दा मोदी यांनी दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.