कुवैत सरकारने देशभरातील मशिदींमध्ये नमाज (Namaz) पठाण जास्त करू नका, असा फतवा काढला आहे. मशिदींमध्ये वाढता विजेचा वापर लक्षात घेऊन आणि संभाव्य वीज संकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्व मशिदींनी नमाज (Namaz) पठणाची वेळ कमी करून वीज आणि पाण्याची बचत करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.
ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी सरकारचे हे पाऊल आवश्यक मानले जात आहे. कुवेतच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने अजानानंतर दिली जाणारी नमाजाची घोषणा कमी करावी तसेच नमाजाची (Namaz) वेळ कमी करावी, असे म्हटले आहे. ऊर्जा, पाणी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत, कुवेतच्या सहा प्रांतांमधील सर्व मशिदींमध्ये काही निश्चित वेळेसाठी वीज बंद राहील. ही कपात झुहरच्या अजाननंतर अर्ध्या तासापासून अस्रच्या अजानच्या (Namaz) १५ मिनिटांपूर्वीपर्यंत आणि अस्रनंतर ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लागू असेल. हे पाऊल कुवेत सरकारच्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन मोहिमेचा एक भाग आहे, जे उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन चालवले जात आहे.
मशिदींमध्ये वीज आणि पाण्याचा वापर कमी करून देशभरात ऊर्जा संतुलन राखता येईल असे सरकारचे मत आहे. सतत वाढणाऱ्या वीज भारामुळे ग्रिडवर दबाव येत असल्याने हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या देखील आवश्यक बनला आहे. मशिदींमध्ये वुडू (अझानपूर्वी केलेली स्वच्छता ) दरम्यान पाणी वाचवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मशीद व्यवस्थापनांना आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. (Namaz)