मतदानकेंद्राच्या परिसरात चपला घालायच्या नाहीत ? Election Commission ने दिले ‘हे’ उत्तर

94
मतदानकेंद्राच्या परिसरात चपला घालायच्या नाहीत ? Election Commission ने दिले 'हे' उत्तर
मतदानकेंद्राच्या परिसरात चपला घालायच्या नाहीत ? Election Commission ने दिले 'हे' उत्तर

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाचे (Paranda Assembly Constituency) अपक्ष उमेदवार गुरुदास कांबळे यांचे पत्र चांगलेच चर्चेत आले आहे. मतदानाच्या दिवशी (Maharashtra Assembly Election 2024) मतदानकेंद्राच्या परिसरात कोणीही चपला घालू नयेत, अशी सरळसरळ मागणीच केली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.

(हेही वाचा – त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली; Eknath Shinde यांनी सांगितले भाजपसोबत जाण्याचे कारण)

परंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे (Gurudas Kamble) हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना चपला हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून देण्यात आले आल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिघात निवडणूक चिन्ह बाळगणे, दर्शवणे यावर प्रतिबंध घातला जातो. या नियमाचा दाखला देत गुरुदास कांबळे यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चपला घालू नयेत, घातल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली. शिवाय, मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्या घालता येणार नाहीत. त्यामुळे पायाला दुखापत होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही कांबळे यांनी पत्राद्वारे केली.

निवडणूक आयोगाने (Election Commission) ही मागणी फेटाळून लावत चपला हे नियमित वापराचे साधन असल्याचे सांगितले आहे. उत्तरादाखल निवडणूक आयोगाचे सहायक निवडणूक अधिकारी जयवंतराव पाटील यांनी म्हटले आहे की, चपला या नियमित वापराचे साधन आहेत. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात त्यांचा वापर थांबवता येऊ शकत नाही. त्यामुळे कांबळेंची मागणी फेटाळण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.