पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके (Chandrakant Katke) यांच्या घरी आयकर विभागाचे (Income Tax) छापे पडले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे (Income Tax) अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. चंद्रकांत कटके त्यांच्या वाघोली येथील घरात अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्राचा हिंदकेसरी असलेला पैलवान अभिजीत कटके (Abhijit Katke) हा अमोल बालवडकर यांचा मेहुणा आहे.
(हेही वाचा-धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा भाग! जाणून घ्या काय म्हणाले Supreme Court? )
अभिजीत कटके (Abhijit Katke) हे भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे सख्खे मेहुणे आहेत. अमोल बालवडकर हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातुन येणारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांचीच उमेदवारी या मतदारसंघातुन जाहीर केली आहे.
(हेही वाचा-Bomb Threat : सरकार आता विमानांना बॉम्बची धमकी देणाऱ्यांवर करणार कायदेशीर कारवाई; दोषींसाठी उचललं मोठं पाऊल!)
त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील अमोल बालवडकर यांना माघार घेण्याची सुचना केली होती . मात्र अमोल बालवडकर यांनी ते येणारी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप जाहीर केलेले नाही. (Abhijit Katke)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community