कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (Konkan Marathi Sahitya Parishad) वतीने दिले जाणारे अतिशय मानाचे असे साहित्यातील विविध पुरस्कार आज कविवर्य केशवसुत स्मारक मालगुंड येथील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात प्रदान करण्यात आले. (Award Ceremony)
2022- 23 या वर्षातील ललित गद्य साहित्य प्रकारातील सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे द्वितीय पुरस्कार डॉ. मंजुषा कुलकर्णी (Dr. Manjusha Kulkarni) यांच्या एक पाती गवताची या ललित लेख संग्रहाला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: राज्यात प्रचारांच्या तोफा थंडावणार)
डॉ. मंजूषा या साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award) प्राप्त सिद्धहस्त लेखिका व कवयित्री असून मराठी काव्य क्षेत्रात त्यांच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झालेली आहे. संस्कृत मराठी आणि हिंदी भाषांमध्ये त्यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित असून त्यांना शारदा तनया अशी मान्यता मिळालेली आहे.
त्यांचा श्यामची आई या प्रसिद्ध मराठी पुस्तकाचा संस्कृत अनुवाद तसेच प्रकाशवाटा या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या चरित्राचा संस्कृत अनुवाद प्रसिद्ध आहे. त्यांना यापूर्वी विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. (Award Ceremony)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community