Dr. Manmohan Singh यांच्यावर निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

127
Dr. Manmohan Singh अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले पार्थिवावर अंत्यसंस्कार
Dr. Manmohan Singh अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले पार्थिवावर अंत्यसंस्कार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचं गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री दहाच्या सुमारास नवी दिल्लीतल्या ‘एम्स’ रुग्णालयात (AIIMS Hospital) निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने (central government) सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. (Dr. Manmohan Singh)

हेही वाचा-Spicejet Share Price : स्पाईसजेटच्या शेअरमध्ये एका आठवड्यात १५ टक्क्यांची उसळी कशामुळे आली?

डॉ. सिंग यांच्यावर आज, शनिवारी (२८ डिसेंबर) सकाळी पावणेबाराच्या सुमारास दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून १ जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे सरकारने जाहीर केले आहे. (Dr. Manmohan Singh)

हेही वाचा-Spicejet Share Price : स्पाईसजेटच्या शेअरमध्ये एका आठवड्यात १५ टक्क्यांची उसळी कशामुळे आली?

डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव गुरुवारी मध्यरात्रीनंतर निवासस्थानी आणले गेले. डॉ. सिंग यांची मुलगी अमेरिकेतून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भारतात येणार असल्याने अंत्यसंस्कारासाठी शनिवारची वेळ निवडण्यात आली. दिल्लीतील निगमबोध घाट येथे सकाळी पावणेबाराच्या सुमारास डॉ. सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत डॉ. सिंग यांचे पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. (Dr. Manmohan Singh)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.