माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सात दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आहे, असे असताना काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हिएतनाम येथे गेले आहेत.
डॉ. सिंग यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच राहुल गांधी (Rahul Gandhi) हे परदेशात गेले आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचे वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नववर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानावरून काँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे बडे नेते अनुपस्थित राहिल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर आता भाजपाकडून काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर हा नवा आरोप केला आहे. एकीकडे देश माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले आहेत, असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community