Ratan Tata Death : “रतन टाटांच्या निधनामुळे अमूल्य रत्न गमावले”, सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली

73
Ratan Tata Death :
Ratan Tata Death : "रतन टाटांच्या निधनामुळे अमूल्य रत्न गमावले", सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली

जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल (Ratan Tata Death) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शोक व्यक्त केला आहे. टाटा यांचे निधन अतिशय दुःखद असून त्यांच्या निधनामुळे देशाने अमूल्य रत्न गमावल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे (Dattatraya Hosbale) यांनी म्हटले आहे.

संघातर्फे (RSS) जारी करण्यात आलेल्या शोकसंदेशानुसार भारताच्या विकास प्रवासात रतन टाटा यांचे योगदान अविस्मरणीय राहील. नवीन आणि प्रभावी उपक्रमांसोबतच त्यांनी उद्योगातील महत्त्वाच्या क्षेत्रात अनेक उत्कृष्ट मानके प्रस्थापित केली. समाजाच्या हितासाठी सर्व प्रकारच्या कामात त्यांचे सततचे सहकार्य व सहभाग कायम राहिला होता. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेचा मुद्दा असो किंवा विकासाचा कोणताही पैलू असो किंवा टाटा समूहात कार्यरत कर्मचाऱ्यांचे कल्याण असो, रतनजी त्यांच्या अद्वितीय विचार आणि कार्याने प्रेरणादायी ठरले होते. अनेक उंची गाठल्यानंतरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि नम्रता अनुकरणीय होती. त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्ही आमचे विनम्र अभिवादन आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना असल्याचे संघाच्या शोकसंदेशात म्हटले आहे. (Ratan Tata Death)

(हेही वाचा-Ratan Tata Death : टाटांच्या अंत्यसंस्काराला अमित शाह राहणार उपस्थित )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) दिवंगत रतन टाटा यांचा नजीकचा संबंध होता. रतन टाटा यांनी 28 डिसेंबर 2016 रोजी नागपुरात संघ मुख्यालयाला भेट दिली होती. आपल्या 79 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला तिलांजली देऊन रतन टाटा नागपुरात आले होते. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर टाटा समूह काहीसा अडचणीत आला होता. त्यामुळे ऐन वाढदिवसाच्या दिवशी टाटांनी सरसंघचालकांची भेट घेऊन सुमारे 30 मिनीटे चर्चा केली होती. या भेटीदरम्यान भाजप नेत्या शायना एन.सी. देखील त्यांच्या सोबत होत्या. रेशीमबाग येथे जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली होती. नागपूर भेटीनंतरच चंद्रपूर जिल्ह्यातील अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत टाटा ट्रस्टने सामंजस्य करार केला होता. त्यानंतर 18 एप्रिल 2019 रोजी रतन टाटांनी पुन्हा संघ कार्यालयाला भेट देऊन सरसंघचालकांशी चर्चा केली होती. (Ratan Tata Death)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.