कल्याणी नगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबाच्या ‘बाळा’चे दोन सॅम्पल घेतले होते. ससून रुग्णालयाप्रमाणे औंधच्या रुग्णालयात सॅम्पल दिले होते. ते सॅम्पल त्याच्या आईच्या सॅम्पलशी मॅच झाले. परंतु ससूनमधील हॉस्पिटलमधील सॅम्पल मॅच झाले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सॅम्पल बदलल्याचे स्पष्ट झाले. बदललेले सॅम्पल कोणाचे होते आणि ते कोणी बदलले याची पोलीस चौकशी करत असताना त्यांचे कनेक्शन थेट डॉ. अजय तावरे याच्यापर्यंत पोहचले. त्यामुळे आज डॉ. तावरे गजाआड आहे. या तावरेवर याआधी अनेक गंभीर आरोप आहे, त्यातीलच एक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुरावे गायब केल्याचा संशय त्यांच्यावर आहे.
अनेकदा फेरफार करून अहवाल केले ‘मॅनेज’
ससून रुग्णालय सरकारी रुग्णालय असल्याने परिसरात होणारे गुन्हे, त्यानंतर आरोपींची तपासणी, त्यांची रक्त तपासणी, खून किंवा अपघातामधील मृतांचा शवविच्छेदन अहवाल याच रुग्णालयात होतात, हे अहवाल न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात, नेमके याच प्रक्रियेत डॉ. तावरे (Dr. Ajay Taware) याने याआधीही अनेकदा फेरफार करून अहवाल ‘मॅनेज’ केल्याचे उघड झाले आहे.
(हेही वाचा Pune Porsche Acident प्रकरणी शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात!)
शवविच्छेदनात अहवालात लपवाछपवी केल्याचा संशय
डॉ. दाभोलकर त्यांची जेव्हा हत्या झाली, तेव्हा त्यांचे शवविच्छेदनही नेमके डॉ. तावरे यानेच केले. त्याने दिलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालावर नंतर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. या अहवालात उघड उघडपणे लपवाछपवी केल्याचे आरोपींच्या वकिलाने न्यायालयाला निदर्शनास आणून दिले होते. दाभोलकर खून प्रकरणात डॉ. तावरे साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर होता. शवविच्छेदन करताना डॉ. दाभोलकरांच्या उजव्या गुडघ्यावरची आणि पायाच्या पुढच्या भागावर ज्या जखमा सख्ख्या नातेवाईकांनी दाखवलेल्या असताना सुद्धा त्या डॉ. तावरेने (Dr. Ajay Taware) अहवालातून गायब केल्या होत्या.
दाभोलकरांच्या शरीरावरील केस गायब
अहवालात त्याचा उल्लेखच केला नाही. पोस्टमोर्टम करण्याआधी पोलिसांनी डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाचे काढलेले फोटो पाहिले तर त्यांच्या मानेवर लांबसडक एक केस दिसतो, हा केस असलेला फोटो जेव्हा न्यायालयात डॉ. तावरे याला दाखवला गेला तेव्हा त्याने तो केस नसून दोरा आहे, असे सांगितले. वास्तवात तो केस असल्याचे प्रथम दर्शनी दिसते, तरीही जरी तो दोरा असता तरी तो पुरावा म्हणून सांभाळून ठेवणे आणि पोलिसांना सुपूर्त करणे ही डॉ. तावरेची (Dr. Ajay Taware) जबाबदारी होती. मात्र त्याने तो केसही गायब केला.
शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सलग केलेच नाही
डॉ. तावरेने न्यायालयात मान्य केले होते की, पोस्टमार्टमची जी नियमावली आहे. त्या नियमावलीचे पालन पोस्टमार्टम करताना केलेले नव्हते, पुरावा म्हणून पोस्टमार्टमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते, पण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सलग करण्यात आलेले नव्हते, असे का करण्यात आले, हा निर्णय डॉ. तावरेने घेतला होता का, असा सवाल उपस्थित होत आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात इतरही शक्यता दिसून आल्या असत्या ज्यामुळे कदाचित तपासाला वेगळी दिशाही मिळाली असती, पण डॉ. तावरेच्या (Dr. Ajay Taware) या संशयास्पद अहवालामुळे शक्यता वास्तवात आली नाही. शवविच्छेदन अहवालात डॉ. तावरेने नेमक्याच गोष्टी नमूद केल्याने या प्रकरणात पुरावे नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community