पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू; राज्यमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांचे आश्वासन

88
पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू; राज्यमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांचे आश्वासन
पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू; राज्यमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांचे आश्वासन

पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या लेखी स्वरुपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी दिले.पोलीस मुख्यालयात दि. १ फेब्रुवारी रोजी डॉ. भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (Pankaj Kumawat) , पोलीस उपायुक्त गणेश शिंदे (Ganesh Shinde) , सागर पाटील, कल्पना बारवरकर (Kalpana Barwarkar) आदी उपस्थित होते.

( हेही वाचा : BMW X3 2025 : बीएमडब्ल्यू एक्स३ गाडीची भारतातील किंमत ७८ लाखांपासून पुढे

राज्यमंत्री डॉ. भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी, पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी त्यांचे कुटुंबीय यांना होत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. संवादामधून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या समोर येत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निवासस्थानी बांधण्यात येत आहेत. याबाबत राज्यस्तरावर समिती सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे आणि निवास व्यवस्था आहे. या ठिकाणी आवश्यक ती तरतूद करून समस्या मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

पोलीस कुटुंबीय कायम दुसऱ्याच्या संरक्षणासाठी तयार असतात. मात्र पोलीस कर्तव्यावर असताना त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. आज संवादामध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांवर दखल घेण्यात येईल. या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरुपात मागविण्यात येऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पोलीस आयुक्त (Police Commissioner) रेड्डी यांनी निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन बांधकामे हाती घेण्यात आली आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघत असल्याचे सांगितले. (Dr. Pankaj Bhoyar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.