आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र

203
आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची 'लाडकी कंपनी योजना' रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र
आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची 'लाडकी कंपनी योजना' रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र

एकनाथ शिंदे सरकारने मुंबईसह राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत रुग्णांना मोठ्या सरकारी रुग्णालयात न जाता उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून हाकेच्या अंतरावर दवाखाना सुरु करून उत्तम सोईसुविधा मिळाव्यात हा उद्देश होता. मात्र या आपला दवाखाना योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले (Dr. Rahul Ghule) यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात जनहित याचिका ही दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोग्यमंत्री (Tanaji Sawant) यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा, अशी मागणीही डॉ. राहुल घुले यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

( हेही वाचा : UP College मधील बेकायदेशीर मशिदीविरोधात विद्यार्थी आक्रमक; म्हणाले, आम्ही हनुमान चालिसा पठण…

डॉ. राहुल घुले (Dr. Rahul Ghule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने दि. १० ऑक्टोबर रोजी HLL Life Care Limited Keral या कंपनीला पाच वर्षासाठी ८६० कोटींचे ३०० आपला दवाखाना चालवायचे काम दिले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आपला दवाखाना किंवा इतर क्लिनिक चालवण्याचा कोणताही अनुभव या कंपनीला नाही. तरीसुद्धा कोणतेही टेंडर न काढता मनमानी कारभार करत सावंत यांनी कंपनीला इतके मोठे काम दिले आहे, असा मोठा आरोप घुले (Dr. Rahul Ghule) यांनी केला. (Tanaji Sawant)

तसेच या कामात ४०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून कंपनीला अनुभव नसल्यामुळे रुग्णांच्या सेवेत अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच हे काम रुग्णांच्या आरोग्याशी निगडित असल्याने कोणतीही निविदा न काढता दिलेले डायरेक्ट काम रद्द करावे. त्यामुळे निविदा काढल्यास चांगली रुग्णालये यामध्ये भाग घेतील आणि रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल, असे मत घुले यांनी मांडले आहे. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहत संबंधित माहिती घुले यांनी दिली आहे. तसेच निविदा रद्द करण्याच्या मागणीचा शासनाने पुनर्विचार करावा आणि रुग्णांच्या हितासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले (Dr. Rahul Ghule) यांनी केला आहे.

दरम्यान तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याचे चिन्ह आहेत. कारण त्यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील तथाकथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांची प्रतिमा मलीन झाली होती. अँब्युलन्स खरेदी घोटाळा, अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच पदोन्नती सारख्या प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यामुळे भाजपकडून सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समवेशाबद्दल आधीच आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.