अहमदनगर दक्षिण (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील सोमवारी, २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह दिग्गज नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार असल्याची माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली. (Dr. Sujay Vikhe-Patil)
अभय आगरकर यांनी सांगितले की, सोमवारी २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत.या निमित्ताने शहरात एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Ayodhya Train Accident: अयोध्येत मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले, मनकापूर ते कटरादरम्यान रेल्वे सेवा स्थगित)
शहरातील माळीवाडा बस स्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ होईल. माळौवाडा येथे ग्रामदेवता श्री विशाल गणपतीचे दर्शन घेऊन पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट व निलक्रांती चौक असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. निलक्रांती चौकात या मिरवणुकीची सांगता होईल. यावेळी शहरातील चौका चौकांमध्ये मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाणार असून सत्कार केले जाणार आहेत. या मिरवणुकीत भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व महायुतीमधील घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती आगरकर यांनी यावेळी दिली. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community