मार्चच्या पाहिल्या आठवड्यापासून मुंबईतील नालेसफाईला होणार सुरुवात – मुख्यमंत्री

206
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांकरिता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्च २०२३च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे मुंबई पालिकेने कळवल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
मुंबईतील नालेसफाईच्या कामांच्या निविदांना विलंब झाल्याकडे लक्ष वेधत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार, पराग अळवणी, तमिल सेलवन यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईतील नालेसफाईची पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे नियमितपणे पावसाळ्यापूर्वी करण्यात येतात. तथापि, नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नालेसफाईची किरकोळ स्वरुपाची कामे पावसाळ्यात करण्यात येतात.
मुंबईतील शहर, पूर्व व पश्चिम विभागातील मोठे व छोटे नाले तसेच पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विविध छोटे/मोठे नाले, पेटीका नाले तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कामांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण ३१ निविदा मागविण्यात आल्या असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही कामे मार्च २०२३ च्या पहिल्या आठवडयात सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.