राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या होणा-या सभांना टोला लगावला आहे. या दोन्ही सभांवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. हाय होल्टेज ड्रामा हा माझा शब्द नाही. तुमचाच शब्द आहे. नाटक हे नाटक असते हो. तीन तास जायचे, एन्जाॅय करायचा आणि घरी जायचे. ते वास्तव थोडीच असते. तो ड्रामा असतो हो, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधत असताना, सुप्रिया सुळेंनी टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात मविआचे सक्षम सरकार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज ठाकरेंना शुभेच्छा. राज ठाकरे यांनी भोग्यांबाबत अल्टिमेटम दिला आहे. त्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. मी ज्या संस्कृतीत वाढले. त्या संस्कृतीत अल्टिमेटम शब्द बसत नाही. यशवंतराव चव्हाणांनी अल्टिमेटम हा शब्दच कधी वापरला नाही. त्यामुळे मला त्या शब्दाचा अर्थ समजत नाही. इंग्रजी डिक्शनरीत तो शब्द आहे, काही तरी अर्थ आहे त्याचा. पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचे सक्षम सरकार आहे. हे सरकार चांगले काम करत आहे. केंद्राचा डेटाही तेच सांगत आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
( हेही वाचा: महागाईचा फटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ )
पत्रकारांनाच सुनावले.
राज ठाकरेंच्या सभेला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. त्यामुळे काहीतरी घडण्याची चिन्हे आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला जर याबाबत काही माहिती असेल, तर तुम्ही पोलिसांत तक्रार करायला हवी. आपल्या महाराष्ट्रावर प्रत्येकालाच प्रेम वाटायला हवे. असे म्हणत त्यांनी पत्रकारांनाच सुनावले आहे. तसेच, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत होणा-या घटनांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात थोडं घडलं ते वाईट आहे, पण उत्तर प्रदेश आणि दिल्लीत जे घडले ते फारच चिंताजनक आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community