Presidential Election 2022 Result: द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

108

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू पद भूषविणार आहेत. आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यामुळे देशभरातून आता द्रौपदी मुर्मू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि यूपीएकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत अखेर द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे लवकरच त्या देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. या निवडणुकांची मतमोजणी अजूनही सुरू आहे. पण मुर्मू यांनी अपेक्षित मतांचा टप्पा गाठल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

मतांचा अपेक्षित टप्पा सर

आतापर्यंत संसदेतील खासदार आणि 20 राज्यांच्या आमदारांच्या मतांची मोजणी पार पडली आहे. त्यानुसार द्रौपदी मुर्मू यांना 5 लाख 77 हजार 777 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना 2 लाख 61 हजार 62 मते मिळाली आहेत. निवडून येण्यासाठी 5 लाख 43 हजार 216 मतांची गरज असल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. या विजयामुळे राष्ट्रपतीपदी विराजमान होणा-या द्रौपदी मुर्मू या दुस-या महिला ठरल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.