नीट पद्व्युत्तर (पीजी) प्रवेशप्रक्रियेतील दिरंगाईमुळे राज्यातील निवासी डॉक्टरांनी आता कडक भूमिका घेतलीय. उद्यापासून सरकारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात निवासी डॉक्टरांचा सहभाग नसणारे. त्यामुळं बाह्यरुग्ण सेवेचा ताण हा रुग्णालयीन प्रशासनावर येणार आहे. राज्यातल्या मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सोमवारपासून बाह्यरुग्ण सेवेतून काढता पाय घेत संपाची हाक पुकारलीय.
२८ नोव्हेंबर रोजी केवळ निदर्शने केलेली
कोरोनाकाळात एमडी-एमएस अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पुढं ढकलली गेलीय. त्यामुळं रुग्णालयात रुग्णसेवेचा ताण आणि डॉक्टरांशी संख्या यात तफावत आढळत आहे. याविरोधात देशातील निवासी डॉक्टरांच्या फोर्डा आणि फेमा या संघटनांनी यापूर्वीच संपाची हाक दिलीय. मात्र राज्यातील मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सुरुवातीला केवळ निदर्शनं केलीत. रुग्णांची अडचण ओळखून केवळ गेल्या रविवारी २८ नोव्हेंबर रोजी केवळ निदर्शनं करुन विरोध दर्शवला. सरकारकडून कोणतीच सकारात्मक प्रतिक्रिया येत नसल्यानं आता संप जाहीर करत असल्याचं मार्डच्यावतीनं सांगण्यात आलं. सरकारच्यावतीनं पुढच्यावर्षी भरती प्रक्रियेचा मुहूर्त का ठेवलाय, असा प्रश्न मार्डकडून विचारला जातोय.
(हेही वाचा धारावीतील टान्झानिया रिटर्नला ओमायक्रॉनची बाधा)
नेमका वाद काय आहे?
कोरोनाच्या दुस-या लाटेच्या सुरुवातीलाच जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केलेली नीटपीजी परीक्षा ११ सप्टेंबर २०११ रोजी घेतली गेली. त्यामुळे काऊन्सिलिंग प्रक्रियेलाही उशीर झालाय. त्यानंतर न्यायालयीन प्रकरणांमुळे दिरंगाईत भर पडली. न्यायालयीन तोडगा निघाल्यानंतरही अद्यापही काऊन्सिलिंग प्रक्रियेला मुहूर्त मिळाला नसल्याने निवासी डॉक्टरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
वादास कारण की…
एमडी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वप्रथम काऊन्सिलिंग केली जाते. त्यानंतर भरतीप्रक्रियेला सुरुवात होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना निवासी डॉक्टर म्हणून काम करता येतं. मात्र या प्रक्रियेला दिरंगाई होत असल्यानं मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं केंद्र सरकारसह, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह तसेच राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला पत्र लिहिलंय. ही प्रक्रिया पूर्ण झाली तर राज्यभरातील रुग्णालयांत अतिरिक्त दोन हजार निवासी डॉक्टर्स उपलब्ध होतील, जेणेकरुन रुग्णसेवेचा ताण कमी होण्यास अगोदरच्या निवासी डॉक्टरांना मदत मिळेल
Join Our WhatsApp Community