मी माझे रेशनकार्डच इकडे काढतो-अनिल परब 

85
सलग तीन दिवसांच्या ईडीच्या चौकशीने कंटाळलेले परिवहन मंत्री अनिल परब यांना शुक्रवारी पुन्हा चौकशीला बोलावले आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ” मी माझे रेशनकार्डच इकडे काढतो”असे बोलून परब निघून गेले.
सलग तीन दिवस ईडीने परब यांची दिवसभर चौकशी केल्याने ते वैतागले असावे, असे त्यांच्या एकंदर बोलण्यावरून दिसून येत होते. दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या मनी लाॅंडरिंगच्या गुन्हयात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू आहे.

चौथ्या दिवशीही चौकशी होणार 

गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीदेखील ही चौकशी करण्यात आली, चौकशी संपल्यावर रात्री ९ वाजता परब यांना सोडण्यात आले. ईडी कार्यालयातून बाहेर पडत असताना, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. परब म्हणाले की, “तीन दिवस झाले ईडी मला चौकशीसाठी बोलावत आहे, मी देखील सलग तिसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.  पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे का असे पत्रकारांनी विचारले असता “आता मी माझे रेशन कार्डच इकडे काढतो, असे बोलून परब निघून गेले. परब यांच्या बोलण्यात पूर्वीसारखा आत्मविश्वास दिसून आला नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.