सध्या भारताचे शेजारील राष्ट्र श्रीलंका या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आली आहे. या ठिकाणी महागाई इतकी वाढली आहे की, तेथील सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. याला कारण म्हणजे श्रीलंकेवर असलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज. कर्जाच्या बोजाखाली एखादा देश रसातळाला जाऊ शकतो, त्यात आणीबाणी लागू शकते, हे वर्तमान परिस्थितीत दिसून आले आहे. विचार करण्याची बाब म्हणजे भारतात अशी सहा राज्ये आहेत, ज्यांच्या डोक्यावर श्रीलंकेच्या इतके कर्ज आहे. उद्या भारतात या राज्यांमध्ये श्रीलंकेसारखी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होवू शकते.
६ लाख कोटींचे कर्ज
श्रीलंकेवर सध्या ६ लाख कोटी रुपये इतके कर्ज आहे. यामुळे देशात परकीय चलनाचा कमालीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम येथील सर्वसामान्याच्या जीवनावर झाला आहे. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.
(हेही वाचा मोठी बातमी! अखेर श्रीलंकेतील आणीबाणी मागे)
श्रीलंकेत काय आहेत जीवनावश्यक वस्तूंचे सध्याचे दर?
- लाल मिरची – ९४३ रु. प्रति किलो
- कांदे – ५६० रु. प्रति किलो
- बटाटे – २७९ रु. प्रति किलो
- साखर – २४० रु. प्रति किलो
- तांदूळ – २२० रू. प्रति किलो
- गॅस सिलिंडर – ४,४०० रु.
- एक अंड – ३० रू.
- गहू – १९० रु. प्रति किलो.
- खोबरेल तेल – ८५० रु. प्रति लिटर
- ब्रेडचे एक पाकीट – १५० रु.
भारतासाठी धोक्याची घंटा
श्रीलंका ६ लाख कोटी इतक्या अवाजवी कर्जाच्या बोजामुळे डबघाईला आला, तितकेच कर्ज किंबहुना त्याहून अधिक कर्ज भारतातील राज्यांवर आहे. भारतात तामिळनाडू या राज्यावर ६ लाख ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्रावर ६ लाख ८ हजार कोटींचे कर्ज आहे. प. बंगालमध्ये ५ लाख ६० हजार कोटी, राजस्थानमध्ये ४ लाख ७० हजारे कोटी, तर पंजाबमध्ये ३ लाख कोटींचे कर्ज आहे. भारतातील राज्यांच्या डोक्यांवर श्रीलंकेपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यामुळे या राज्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीसाठी ही धोक्याची घंटा आहे. कर्जाचा वाढता बोजा हा या राज्यांमध्ये कदाचित श्रीलंकेप्रमाणे आणीबाणी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आर्थिक शिस्त किती महत्वाची आहे, याची जाणीव आता निर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
(हेही वाचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला पुन्हा घेरले, शिवसेना भवनाबाहेर केली बॅनरबाजी!)
Join Our WhatsApp Community