माजी आमदार विवेक पाटील यांना अटक! 

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ८०० कोटी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. 

71

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत तब्बल ८०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय यांनी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल येथील माजी आमदार विवेक पाटील यांना मंगळवारी, १५ जून रोजी अटक करण्यात आली. मनी लॉन्डरिंग ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

(हेही वाचा : अयोध्येच्या जमिनीचा ‘तो’ करार १० मिनिटांतील नव्हे, तर १० वर्षांपूर्वीचा! )

या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता. मात्र हा घोटाळा १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाला आपोआप त्या प्रकरणाच्या तपासाचा अधिकार मिळतो. त्याप्रमाणे अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यानंतर ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

राज्य सरकारकडून विवेक पाटलांना वाचवण्याचा प्रयत्न! 

या बँकेतील गुंतवणूकदारांनी त्यांना न्याय मिळावा याकरता त्यांनी रिझर्व्ह बॅंकेवर मोर्चा काढला होता. तसेच या घोटाळ्यातील आरोपांनी शिक्षा होण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र विवेक पाटील यांना महाविकास आघाडी सरकार वाचवत असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. पाटील यांच्या मालमत्तेवर या आधीच टाच आणण्यात आली आहे. त्यांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. शेकापने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने पाटील यांना वाचविले जात असल्याचा भाजपचा आरोप होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.