
ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याच्या नादात आमदार उत्तम जानकर यांचा शपथविधी राहून गेला आहे. जानकर यांच्याशिवाय अन्य सात आमदारांचा अद्याप शपथविधी होणे बाकी आहे. गेल्या दोन दिवसात २८८ पैकी २७९ विधानसभा सदस्यांनी शपथ घेतली. (EVM)
दोन दिवासात २७८ आमदारांचा शपथविधी
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतनर ७ ते ९ डिसेंबर २०२४ असे तीन दिवस विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. त्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवासात २७९ आमदारांनी शपथ घेतली. (EVM)
(हेही वाचा- Uday Samant यांचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लोकांची माथी भडकवण्याचा मविआचा डाव’)
अधिवेशनासाठी हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड झाली आणि त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज भवन येथे आमदारकीची आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यामुळे २८८ पैकी २८७ आमदारांनी शपथ घेणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवासात २७८ आमदारांनी शपथ घेतली. शनिवारी १७३ आणि रविवारी १०६ आमदारांनी शपथ घेतली. (EVM)
कोण आहेत आठ आमदार?
अन्य आठ आमदार शपथ घेणे बाकी असून त्यात उत्तम जानकर हे एक असून जानकर हे गेले दोन दिवस माळशिरस येथील मारकटवाडी या गावात EVM विरोधी आंदोलन करण्यात व्यस्त असल्याने त्यांचा शपथविधी झालाच नाही. तर अन्य सात शपथ न घेतलेल्या आमदारांमध्ये जयंत पाटील, विनय कोरे, शेखर निकम, विलास भूमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके यांचा समावेश आहे. (EVM)
(हेही वाचा- “…मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?” Eknath Shinde यांचा शरद पवारांना सवाल)
दरम्यान रविवारी विरोधी पक्षातील नाना पटोले, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि अन्य नव्या आमदारांचा शपथविधी पार पडला. शनिवारी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. (EVM)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community