मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी-गाठी करत असल्याने त्यांचा वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासारखाच दिसणा-या व्यक्तीवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. विजय नंदकुमार माने असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर विजय माने यांचेदेखील स्पष्टीकरण समोर आले आहे.
काय केला ड्युप्लिकेट सीएम यांनी खुलासा
मला माहीत नसताना माझे नकळत फोटो काढले गेले. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे विजय माने यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतीमा मलीन केली, असा आरोप मानेंवर करण्यात आला आहे. याच आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हे पोलिसांनी केलेले सर्व आरोप विजय माने यांनी फेटाळून लावले आहे.
(हेही वाचा – डुप्लिकेट एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल, काय आहे कारण?)
पुढे ते असेही म्हणाले की, मी वेळोवेळी पोलिसांनी सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री साहेबांना आणि माध्यमांना मी त्या-त्या वेळी सांगितले की, मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतीमा मलीन होईल, असे कोणतेही कृत्य मी केलेले नाही आणि कधी करणारही नाही. गैरवापर करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे माने यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community