- सुजित महामुलकर
गेले काही दिवस राजकीय पक्षांनी महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण आणि प्रभाग फेररचना याबाबतची सुनावणी २५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आणि राजकीय पक्षांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थेट ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे सरकल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. (BMC Elections)
(हेही वाचा – राज्य सरकारने Atal Setu संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय)
सोयीस्कर प्रभाग रचना
तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या प्रभागांची फेररचना झाली आणि काही प्रभाग वाढवण्यात आले. त्यावर महाविकास आघाडीने सोयीस्कर असलेले भाग बदलून प्रभाग फेररचना केली असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे प्रभाग फेररचना आणि ओबीसी आरक्षण या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. (BMC Elections)
(हेही वाचा – Hawker : महानगरपालिकेने जप्त केले २,७६३ अनधिकृत हातगाड्या, सिलिंडर आणि इतर साहित्य )
‘तारीख पे तारीख’
मात्र गेले दोन वर्षे केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत असून मंगळवारी २८ जानेवारी २०२५ या दिवशी पुढील सुनावणीची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ मिळाली आणि निवडणूक विषय लांबणार असल्याचे संकेत मिळाले. फेब्रुवारीच्या शेवटी सुनावणी झाली तरी एप्रिल-मे २०२५ मध्ये निवडणुका घेणे कठीण आहे. तसेच त्यानंतर जूनपासून मान्सून सुरू होत असल्याने सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे व्यावहारिक दृष्ट्या सोयीचे नसल्याने महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबर २०२५ पर्यंत पुढे जाण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. (BMC Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community