मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. बुधवार आणि गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 7 नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी 5 निरनिराळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. (CM Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड (VP Jagdeep Dhankhad) यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना छत्रपती शिवरायांची अश्वारुढ मूर्ती भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची (Swatantrya Veer Savarkar) मूर्ती भेट दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती भेट दिली. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सिद्धीविनायकाची मूर्ती भेट दिली.
(हेही वाचा – Cabinet Expansion : शिवसेनेत इच्छुक जास्त असल्याने नाराजीची शक्यता; १३ मंत्री ठरले ?)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा केली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community