ओबीसी मोर्चादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील, पडळकर, दरेकर, गिरीश महाजन पोलिसांच्या ताब्यात

78

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला होता. योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. या मोर्चामध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन तसेच, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर हे नेते देखील सहभागी झाले होते. मात्र, सध्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

भाजपचा मविआ सरकारवर आरोप 

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भाजप आक्रमक असून, बुधवारी बड्या राजकीय नेत्यांनी मुंबईत महाविकास आघाडी सरकारविरोधात हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर आदी नेत्यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी पहिला आयोग नेमला असताना, तो रद्द करुन दुसरा आयोग नेमण्यामागचे नेमके कारण काय आहे ही प्रक्रिया आणखी लांबण्याचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायचा मविआ सरकारचा डाव आहे, असा आरोप भाजपने केला.

( हेही वाचा: आता बाईक चालकासह मागे बसणा-यालाही हेल्मेट बंधनकारक )

हे मविआचे षड्यंत्र 

महाराष्ट्रातील 346 जातींचा समावेश असलेल्या 52 टक्के ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. त्या आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत. मविआचे षड्यंत्र ओबीसींनी लक्षात घेतले पाहिजे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.