एसटी कर्मचाऱ्यांना समजून घ्या, अरेरावीकरता राज्य दिले नाही!

140

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजतागायत सुरू आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीही पगाराविना गेली. कर्मचाऱ्यांना समजून घेणं महत्वाचे आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून योग्य तोडगा काढला हवा, असे राज ठाकरे पत्रकार परिषदे दरम्यान बोलत होते.

अनिल परबांवर टीका

१९६० साली एसटी सुरू होऊन महाराष्ट्रातील गावामध्ये एसटी पोहोचली. एसटीमधला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोवर सुरळीत कामकाज होणार नाही. या एसटीसाठी एक उत्तम मॅनेजमेंट कंपनी हवी. एसटी कर्मचारी सगळ्या युनियन बाजूला सारून हक्कांसाठी एकत्र आले. तुम्हाला लोकांसाठी राज्य दिलं आहे, लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर अधिकृतपणे बोलावे असे बोलत राज ठाकरेंनी अनिल परबांवर टीका केली आहे. तसेच मेस्मा अंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास राज ठाकरेंनी विरोध दर्शवला आहे.

( हेही वाचा : ॲक्शन मोड ऑन! राज ठाकरेंचा आज नाशिक दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद )

जातींचे राजकारण नको

ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले,  जातीपातीतून बाहेर आल्याशिवाय आपल्याला चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्र खितपत पडावा असे काही जणांना वाटते या राजकारणामुळे मुख्य विषय बाजूला पडतात. जसे की, मुकेश अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली हे कोणालाच ठाऊक नाही. यामुळे या विषयांमुळे मूळ विषय बाजूला सारले जातात असेही राज यांनी स्पष्ट केले.

विचार करून मत द्या 

आरोग्य भरती तसेच म्हाडा पेपर फुटी प्रकरणी मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, तरूणांनी सुशिक्षित तसेच सुज्ज्ञ होणे गरजेचे आहे. जेणेकरून तरूणमंडळी विचार करून मतदान करतील आणि असे लोक पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. यासाठी येत्या निवडणुकीत विचार करून मतदान करा असा, सूचक सल्ला राज ठाकरेंनी तरूणांना दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.