शिवसेनेच्या उद्धव गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला, दोन्ही बाजूने सर्वाधिक गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, मात्र या मेळाव्याच्या आधी काही तासाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी त्यांनी स्वतःला शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिले.
इसी बदलाव की आज महाराष्ट्र और देश को ज़रूरत है … You are the change which our State & Nation wants to see Shri @mieknathshinde ji#DussehraFestival #Dussehra #Dussehra2022 https://t.co/a3zTCkg6HV
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 5, 2022
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा शिवसेनेचा वारसदार कोण, याची चर्चा रंगली. मेळाव्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत, ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे – हरिवंशराय बच्चन’, असे म्हटले. तर त्यावर अमृता फडणवीस यांनी शिंदे यांचे हे ट्विट रिट्विट करत, याच बदलाची महाराष्ट्राला आणि देशाला गरज असल्याचे सांगितले. मेळाव्याच्या आधी अमृता फडणवीस यांनी ‘पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचे काय म्हणणे असते हे ऐकणे गरजेचे असते. त्यामुळे, मी दोघांच्याही मेळाव्यातील भाषण ऐकणार आहे. मात्र माझे फेव्हरेट एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे झिंदाबाद… असे म्हणत शिंदेंच्याच दसरा मेळाव्याला गर्दी होईल, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले होते.
Join Our WhatsApp Community