आमचा दसरा मेळावा आहे, त्यांचा कचरा मेळावा आहे. खुद्दारांचा मेळावा याठिकाणी होत आहे तिकडे गद्दारांचा मेळावा होत आहे. इकडे चटणी भाकरी आहे, तिकडे ५० खोकी आहेत. ज्या उद्धव ठाकरे यांचा घात केला, त्यांना धडा शिकवणार आहे. उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी आपल्याकडे काही नाही आज घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आपल्याकडे खूप आहे, अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.
अडीच तीन महिने या राज्यात हळहळ आहे, संताप आहे. २२ तारखेला उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडला आणि महाराष्ट्र हळहळ करत आहे. एका सुसंस्कृत माणसाला त्यांच्या गद्दारांनी राज गादीवरून खाली खेचले, याचे दुःख आहे. या मेळाव्याची परंपरा सगळ्यांनी सांगितले, एकाच वेळी दोन दसरा मेळावा होणार, अशी चर्चा होत आहे. आपण एकच नेता, एकच पक्ष आणि एकच ठिकाण हा तोच दसरा मेळावा होतो, तोच मला मेळावा माहित आहे, असेही जाधव म्हणाले. .
Join Our WhatsApp Community