दिपाली सय्यदांचे दोन्ही दगडावर पाय, शिवाजी पार्कत दाखल, शिंदे गटाच्या मेळाव्याला शुभेच्छा

126

काही तासांतच उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांचे मेळावे सुरू होणार आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या त्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जमू लागले आहेत. त्या दोन्ही ठिकाणी जमलेले आम्हीच निष्ठावंत असल्याचा दावा करत आहे. अशा वेळी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्या, मात्र तिथे राहून चक्क शिंदे गटाच्या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.

दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया अचंबित करणारी

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे आल्या आणि माध्यमांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी माध्यमांनी त्यांना कोणत्या मेळाव्याला गर्दी होणार, अशी अपेक्षा विचारणा केली, तेव्हा दिपाली सय्यद यांनी चक्क दोन्ही ठिकाणच्या मेळाव्याला गर्दी होणार, असे आश्चर्यकारक उत्तर दिले. माध्यमांनी त्यावर आपण आधी कुणाचे भाषण ऐकणार, उद्धव ठाकरे यांचे की एकनाथ शिंदे यांचे, त्यावरही सय्यद यांनी आपण दोघांचे भाषण ऐकणार असे सांगितले, सय्यद यांच्या उत्तराने शिवसैनिक अचंबित झाले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना पाठिंबा समर्थन देणाऱ्या सय्यद यांनी या आधी शिंदे गटावर टीका केली होती, आता सय्यद यांनी चक्क शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेला येवून शिंदे गटाच्या मेळाव्याला ही अधिक गर्दी जमेल, असे सांगून उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी गोंधळात टाकले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.