शिंदे गटाच्या व्यासपीठावर बाळासाहेब, उद्धव गटाच्या मंचावर कोण?

226

काही तासांतच मुंबईत उद्धव गट आणि शिंदे गट यांचे मेळावे सुरु होणार आहेत. त्यामध्ये कोणत्या मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिक जमणार यावर आता चर्चा जोरदार सुरु झाली आहे. त्याच बरोबर कोणत्या मेळाव्यात बाळासाहेबांचे विचार मांडले जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यातच आता दोन्ही मेळाव्यांच्या व्यासपीठावर बॅनर कोणते आहेत, हा विषयही चर्चेला आला आहे. त्यात शिंदे गटाचे व्यासपीठ अधिक चर्चेत आहेत. कारण त्यांच्या व्यासपीठाच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे गटाच्या मेळाव्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

उद्धव गटाच्या व्यासपीठावर परिवारवाद?

उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे जो परिवार वादाचा आरोप उद्धव ठाकरे गटावर होत आहे, त्याचे पडसाद मेळाव्याच्या बॅनरवर पडलेले दिसले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटात बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर मांडले जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(हेही वाचा दिपाली सय्यदांचे दोन्ही दगडावर पाय, शिवाजी पार्कत दाखल, शिंदे गटाच्या मेळाव्याला शुभेच्छा)

शिंदे गटाच्या मेळाव्यात बाळासाहेबांचे विचार?

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या व्यासपीठाच्या बॅनरवर केवळ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असा दावा केला आहे. त्याचेच पडसाद शिंदे गटाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर उमटलेले दिसले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या मेळाव्यात बाळासाहेबांचे विचार मांडले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

(हेही वाचा निलेश राणे म्हणतात, चलो शिवाजी पार्क, फोटो केला ट्विट!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.