माझा बाप चोरला, असे ते म्हणत आहेत, आपल्या हिंदू संस्कृतीत श्रावण बाळ आपण पहिला, पण आपल्या संस्कृतीत माझा बाप चोरला, असे कोण म्हणत नाही. इंदिरा गांधी यांच्या वेळी काॅंग्रेस फुटली, एनटी रामाराव यांचा पक्ष, समाजवादी पक्ष, पासवान यांचा पक्ष फुटला या सगळ्यांपैकी कुणीही कधीच ‘माझा बाप चोरला, पण आज हे असे म्हणत आहेत’, अशी टीका शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दसरा मेळाव्यात केली.
युवराजांचे लहानपण खोक्यातून झाले
युवराजांचे लहानपण खोक्यातून झाले. महापालिकेतून खोके मिळायचे त्यातून ते मोठे झाले. भुजबळ गेले, राज ठाकरे गेले तेव्हा आम्ही शिवसेनेतच राहिलो, तेव्हा आम्ही किती खोके मिळाले हे युवराजने विचारले पाहिजे होते, नारायण राणे बाहेर पडले तेव्हा आम्हाला त्यांची कार्यालये फोडायला सांगितले, आयुष्यतील महत्वाचे क्षण आम्ही पक्ष वाढवण्यासाठी घालवले, तेव्हा आम्हाला किती खोके मिळाले याचाही विचार झाला पाहिजे. जूनच्या अखेरीस पक्षप्रमुख नालेसफाईची पहाणी करून नंतर लंडनला जायचे, तेव्हा आम्ही मात्र महापालिकेच्या कामात व्यस्त असायचो, या क्षणाची खोक्याशी तुलना होऊ शकत नाही. युवराज म्हणतात, त्यांचे बाबा रुग्णालयात होते तेव्हा आम्ही त्यांना धोका दिला, हेच युवराज त्यांचे बाबा रुग्णालयात होते, तेव्हा युवराज परदेशात गेले होते आणि पबमध्ये मजा मारत होते, ती सर्व माहिती आम्ही देत आहोत, अशी टिका खासदार शेवाळे यांनी केली.
(हेही वाचा १११ साधूंचा शंखनाद, चांदीचे धनुष्य… शिंदे गटाकडून ‘करेक्ट कार्यक्रम’)
Join Our WhatsApp Community