वीर सावरकरांच्या अवमानाविरोधात ठराव का आणला नाही? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

126

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही कधी ठामपणे सांगितले नाही. वीर सावरकर यांच्यावरील अवमानाच्या विरोधात सभागृहात एकदा ठराव आणण्याचा विचार झाला, तेव्हा तुम्ही पुढाकार का घेतला नाही? का ठराव आणला नाही? वीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांचे नाव आम्ही अभिमानाने घेतो. पण काँग्रेसचा विरोध म्हणून त्यांचे नाव आम्ही घ्यायचे नाही, हा कुठला न्याय? त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत काहीच योगदान नाही का? वैचारिक विरोध मी समजू शकतो, पण आघाडीत एकमेकांच्या भावनांचा आदर करायचा असतो, का नको करायला? आम्ही काँग्रेसच्या भावनांचा आदर करायचा आणि काँग्रेस त्याच्या शिदोरी मासिकात सावरकरांचा उल्लेख माफीवीर करायचे? आणि आम्ही गप्प बसायचे? आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी येथील दसरा मेळाव्यात घणाघाती हल्ला केला.

(हेही वाचा शिवसेना आम्ही नव्हे, तुम्ही संपवली; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात)

बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली 

एकवेळ माझे दुकान बंद करेन. पण काँग्रेससोबत जाणार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आहे. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी केलेला द्रोह आहे. विद्रोह आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी तुम्ही लाचारी स्वीकारली आहे. हेच तर आमचे दुर्दैव आहे. या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, असे बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यात सांगितले होते. आज त्याच काँग्रेसच्या मदतीने तुम्ही दसरा मेळाव्यात गर्दी करत आहात, चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत तुमचे लोक सहभागी झाले होते. त्यांचा पदर पकडून तुम्हाला चालायला लागत आहे, किती लाचारी करणार, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

(हेही वाचा शिवसैनिकांचा आवाज शिवाजी पार्कात पोहोचू द्या- रामदास कदम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.