शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे झाला, त्यावेळी व्यासपीठावर तीन महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या आणि त्यांनतर थेट शिवसेनेच्या उपनेते बनलेल्या सुषमा अंधारे यांनी थेट दसरा मेळव्याच्या व्यासपीठावरून भाषण करण्याची संधी दिली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तोंडभरून कौतुक केले. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा कौतुक सोहळा केला. मात्र याच अंधारे यांनी २०१९च्या निवडणुकीच्या प्रचारात मुंब्रा येथे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून शिवसेनेवर शिव्यांची लाखोली वाहिली होती, तेव्हा त्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होता. अंधारे यांच्यात इतका बदल झाला कसा, असा हा प्रश्न आहे.
(हेही वाचा नवख्या सुषमा अंधारेंना भाषणाची संधी, जुन्या-जाणत्यांना व्यासपीठावर खुर्चीही नाही)
(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)