नवख्या सुषमा अंधारेंना भाषणाची संधी, जुन्या-जाणत्यांना व्यासपीठावर खुर्चीही नाही

166

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक असलेल्या सुषमा अंधारे यांनी तीन महिन्यापूर्वी उद्धवसेनेत प्रवेश केला. अवघ्या नव्वद दिवसांच्या कारकीर्दीत त्यांना उपनेतेपदी बढती देण्यात आली. शिवाय दसरा मेळाव्यात अनेकांना डावलत भाषणाची संधी दिली गेली. तीन-चार दशके शिवसेनेसाठी घाम गाळणारे शिवसैनिक मात्र यामुळे नाराज असून, शिवतीर्थावरील भाषणात बाळासाहेबांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळणाऱ्या अंधारे यांना तात्काळ समज द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

महिला आघाडीचे नेतृत्त्व करणाऱ्या नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे यांच्यासह दिवाकर रावते, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत हे दसरा मेळाव्याला उपस्थित असूनही त्यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. याऊलट निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव आणि तिन महिन्यांपूर्वी शिवसेनेचा उंबरा ओलांडलेल्या सुषमा अंधारे यांना व्यासपीठावर मानाची खुर्ची आणि भाषणाची संधी देण्यात आली. किंबहुना पक्षप्रमुख भाषणाला येण्याआधीच्या क्रमानुसार या दोघांचा पहिला आणि दुसरा नंबर होता. त्यामुळे जुन्या-जाणत्या शिवसैनिकांत नाराजी दिसून आली.

(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)

बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणणे टाळले

नाराजी उघडपणे बोलून दाखवली जात नसली, तरी अंधारे यांना वेळीच आवरा, असा बहुतांश शिवसैनिकांचा सूर आहे. कारण, सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील भाषणाला सुरूवात करताना अनेक वीरपुरुषांची नावे आदरपूर्वक घेतली. पण बाळासाहेबांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, असे त्या म्हणाल्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी संग केल्यापासून बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राटऐवजी वंदनीय म्हटले जात असल्याची टीका भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने केली जात आहे. असे असताना सुषमा अंधारे यांनी ती चूक दसरा मेळाव्याच्या मंचावरून का करावी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.